Tuesday, January 24, 2012

"अरे तो नाग बघ न काय मस्त फना काढून बसलाय!" "मगर हा प्राणी खरच शांत असतो रे आपण उगीचच हाईप करतो." "हा अजगर पाहून मला तर ध्यानस्थ योगी आठवतात."  असे काही संवाद  तुम्ही ऐकत असाल  तर तुम्ही नक्कीच भारतातल्या सर्वात मोठ्या सर्पोद्यानात आला आहात.

मगर  मगरीच्या  मगरमिठीत ..! 
सापांचे उद्यान हि कल्पनाच तशी हटके. भारतात अशी ३ उद्यानं आहेत. साधारण प्राणीसंग्रहालयामध्ये साप किंवा थोडेफार सरपटणारे प्राणी पाहायला मिळतात. परतू फक्त सापांपासून सुरु होऊन प्राणीसंग्रहालयात रुपांतरीत झालेलं एकमेव उदाहरण, नाव-पुणे सर्पोद्यान. सर्पोद्यान हि संकल्पना प्रत्यक्षात आली १९८४ साली. हे उद्यान नंतर 'कात्रज सर्पोद्यान' म्हणूनही  ओळखलं जाऊ लागलं. १९९९ साली  पेशवे पार्कमधील प्राणी इथे मोठ्या जागेत  (१३० एकर )हलवण्यात आले आणि राजीव गांधी  प्राणीसंग्रहालयाचा जन्म झाला.
दोन धामिनी not दामिनी 
सरपटणारया प्राणीवर्गातील विषारी आणि बिनविषारी असे एकूण २८ जातींचे प्राणी इथे पाहायला मिळतात. या २८ जातींचे मिळून १४१ जीव इथे आहेत.   
सर्पोद्यानात वेगेवेगळे साप पाहत असताना एका पिंजऱ्यात बराच वेळ काहीच सापडत नाही सरतेशेवटी वर फळीवर बसलेला दिसतो तो Green Iguana. प्राण्यांप्रमाणे स्वतःला वातावरणाशी जुळवून घेणं म्हणजे काय हे या पिंजऱ्यासमोर आल्यावरच  समजेल. ३ - ३.५ फूट लांबअसणारा हा iguana या छोट्या पिंजऱ्यातपण मला अर्ध्या मिनिटाच्या आत सापडलेला नाही.(मी इथे २ डझनाहून जास्त वेळा गेलेलो आहे) दुसरा मला आवडणारा जीव म्हणजे जाळीदार अजगर (रेतीचुलातेद/Regal Python- longest living reptile species on the earth). जेव्हा हा अजगर फिरत असतो तेव्हा त्याला पाहण्यात अर्धा तास तरी जातोच जातो. जिवंत साप इतक्या जवळून पाहण्याची चैन आपण इथेच करू शकतो!
नाग म्हणजे सर्पोद्यानातला सर्वात जास्त आवडीने पाहिला जाणारा साप. नशीब बलवत्तर असेल तर तुम्ही फणा काढलेले नागही पाहू शकता. भय, कुतूहल आणि आनंद या सर्व भावना एकत्र अनुभवायचे असतील तर इथे यायलाच हवं.


उद्यान नावारूपाला येत होतं तसे लोक जखमी साप, पक्षी, काहीवेळेस प्राणी आणून देऊ लागले, यातूनच पुढे प्राणी अनाथालय चालू झाले. आजपर्यंत या उपक्रमाने शेकडो पक्ष्यांचे आणि प्राण्यांचे जीव वाचवून त्यांना त्यांच्या अधिवासात परत सोडून दिलं आहे. 

राजीव गांधी प्राणी संग्रहालायाबद्दल पुन्हा केव्हातरी. 

Brief list of Reptiles from snake park for your reference- King Cobra, Cobra Russel Viper, Saw Scaled Viper, Common Krait, Indian Rock Python, Johns Sand Boa, Reticulated Python, Crocodiles, Tortoises and turtles etc.

4 comments:

  1. Visit this link..

    http://www.corbettpark.com/

    ReplyDelete
  2. Good you have started writing blog.. Knowledge sharing.. :) keep it up..

    ReplyDelete
  3. This is very famous site.. i hope you have heard about this..

    http://www.crocodilehunter.com.au/

    ReplyDelete