आता लिहू..अ, आ , इ, ई,.....
आज २०११ च्या अगदी शेवटच्या पडावावर आपण आलो आहोत. हे वर्ष माझ्यासाठी अतिशय आनंददायी होतं. नवीन वर्षाचा विचार करताना आता ब्लॉग च्या माध्यमातून लिहूच असं ठरवलं आहे. आजपर्यंत जे काही पाहिलं , खाल्लं आणि अनुभवलं त्यातलं काही शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न.
मागील वर्षभरात झालेल्या काही घटनांमुळे खरेतर लिहिण्याची प्रेरणा मिळाली. त्या घटना उधृत करण्यापेक्षा ब्लॉग मधून मला काय सांगायचं आहे ते थोडक्यात -
१. पुण्यात पाहायला काहीच नाही, सारा काही पुण्याच्या आसपास आहे असं पुण्यात बाहेरून येऊन स्थायिक झालेल्यांचा समज असतो. हा भ्रम दूर करणे.
२.पुणेकर आहे म्हणजे वेगळेपणा आलाच. पुण्याच्या प्रचंड खाद्यसंस्कृतीतील काही तीर्थक्षेत्रांची आणि काही वेगळेपणा जपणाऱ्या नव्या मंदिरांची माहिती प्रसृत करण्याचा देखील मानस आहे.
३. भाषेतील काही अलंकार,शब्द आणि कविता आताशा खूप आवडू लागले आहेत. तो अनुभवही तुमच्याशी शेअर करायचा आहे.
ब्लॉग लिहिण्याचा श्रीगणेशा करतो आहे, तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा.
नवीन वर्षात तुम्हाला अनेक उत्तमोत्तम अनुभव मिळोत हि सदिच्छा !!!

HAPPY NEW YEAR !!
good blog..nice article publishing by you...appreciate on you...thanks for giving detail..
ReplyDeleteChevrolet Corsica AC Compressor
Thank You, aisha
ReplyDelete