चीन, जपान आणि जर्मनी हे
तीन देश संशोधनाच्या बाबतीत जगात अनुक्रमे २ , ३ व ४ थ्या स्थानावर आहेत. अमेरिका
प्रथम क्रमांकावर विराजमान आहे तर भारत १० व्या स्थानावर आहे . प्रथम स्थानावर
असणाऱ्या अमेरिकेत सगळ्या जगातील हुशार मंडळी येत असतात (ब्रेन ड्रेन) या कारणास्तव
आपण प्रस्तुत लेखात फक्त चीन, जपान आणि जर्मनी यांचा विचार करू. वरील क्रमांक हे
देशाच्या एकत्रित संशोधनातील योगदानावर आधारित आहेत.याबाबतच्या अधिक माहितीसाठी पुढील
संकेतस्थळाचा उपयोग करावा http://www.scimagojr.com/
या तीनही देशांच्या प्रगती
मध्ये संशोधनाचा फार मोठा हातभार आहे आणि पुढेही तो असणार. या तीनही
देशांमध्ये काय साम्य आहे ते शोधण्याचा मी प्रयत्न केला, त्यातही त्यांच्या शिक्षण
व्यवस्थेतील साम्यस्थळे शोधण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रयत्नातून अस दिसून आलं की या तीनही देशात किमान पदवीपर्यन्तचे शिक्षण (मग ते कोणत्याही विद्याशाखेचे असो )
ते मायभाषेतून घेता येते. किंबहुना काही विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण देखील
मायभाषेतून घेता येते.
इंग्रजी ही जगाची भाषा,
विज्ञान तंत्रज्ञानाची भाषा. इंग्रजी भाषेत प्रचंड मोठ्या प्रमाणावर ज्ञान भांडार
उपलब्ध आहे. हे भांडार इतकं अतिप्रचंड आहे कि इतर भाषा तिच्या पासंगालाही पुरू शकत
नाहीत. या मोठ्या अडचणीवर देखील या देशांनी उपाय शोधून काढला - भाषांतर! इंग्रजी मध्ये उपलब्ध झालेल नवं संशोधन, नवी पुस्तके भाषांतरित करून
विनाविलंब स्वभाषेत उपलब्ध केली जातात. कुणी म्हणतील की हे एकच कारण नाहीये, मान्य
परंतु हे एक महत्वाचं कारण निश्चितच आहे असं मी मानतो. मायभाषेतून शिक्षण घेतल्याने होतं काय की तुम्हाला तुमचे विचार अथवा तुमच्या संकल्पना मांडण्यासाठी योग्य शब्द
आणि शब्दप्रयोग शोधण्याची गरज उरत नाही. आता संकल्पना स्पष्ट होण्यासाठी शिक्षण घेण्याची गरज पडते, काही लोक खूप वर्ष एकाच प्रकारचं काम करात असतात त्यांच्या त्या कामाच्या संकल्पना स्पष्ट असतात. पण त्या संकल्पना शब्दात व्यक्त करणं त्यांना शक्य नाही होत, कारण त्याला म्हणतात काय तेच माहीत नसतं. हे असं का होतं कारण आपल्या इथे विज्ञान शिक्षण इंग्रजीत आणि निम्म्या विद्यार्थ्यांचा इंग्रजीशी छत्तीसचा आकडा हा ठररेलाच. (दहावीला नापास होणाऱ्या मुलांमधील खूप सारे इंग्रजीमुळे नापास होतात.)
त्याबाबत मी पुढील उदाहणे देऊ इच्छितो. महाराष्ट्रात एका मेक्यानिक ने सायकल वर चालणारे बी रोपण यंत्र बनवले, दुसरीकडे दक्षिणेतील अरुणाचालाम ने sanitary napkins सहजपणे बनवता येतील यासाठी मशिन तयार केले अशी अनेक उदाहरणे देता येतील. या दोघांनाही या गोष्टी प्रत्यक्षात साकारताना मिळणारी माहिती इंग्रजीत असल्याचा फार त्रास झाला.
त्याबाबत मी पुढील उदाहणे देऊ इच्छितो. महाराष्ट्रात एका मेक्यानिक ने सायकल वर चालणारे बी रोपण यंत्र बनवले, दुसरीकडे दक्षिणेतील अरुणाचालाम ने sanitary napkins सहजपणे बनवता येतील यासाठी मशिन तयार केले अशी अनेक उदाहरणे देता येतील. या दोघांनाही या गोष्टी प्रत्यक्षात साकारताना मिळणारी माहिती इंग्रजीत असल्याचा फार त्रास झाला.
प्रथम भाषेत शिक्षण हे यासाठी महत्वाचं आहे. भारतात ते वयाच्या १५ वर्षापर्यंत जर शक्य असेल तर
त्यापुढेही शक्य होऊ शकत. गरज आहे ती इच्छाशक्तिची. उदाहरणादाखल आपण गुजरातच उदाहरण
घेऊ (आजकाल सगळेच गुजरातच उदाहरण घेतात म्हणून मीही घेतो). महाराष्ट्रात ११वी आणि
१२वी विज्ञान शाखा हा अभ्यासक्रम इंग्रजी भाषेतून शिकवला जातो तर गुजरात मध्ये तो
खूप वर्षे आधीपासून गुजरातीमध्ये शिकवला जातो. ११ वी , १२वी शक्य असेल तर पुढे का
नाही?
आज जरी अनेक विषयांवरील पुस्तके मराठीत उपलब्ध असली तरी अजूनही अनेक पुस्तके (विज्ञान तंत्रज्ञानाची)
मराठीत उपलब्ध नाहीत. आपणातील ज्यांना शक्य आहे त्यांनी इंग्रजी पुस्तके मराठीत भाषांतरित होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मराठी भाषेला अनेक वैज्ञानिक संज्ञांची गरज
आहे. खूप संज्ञा आज उपलब्धदेखील असतील तर काळाच्या पडद्याआड लुप्त झाल्या आहेत
त्यांचा पुनःशोध (research) घेणेही महत्वाचे ठरेल. तुमच्यातील ज्यांना, जसं शक्य होईल त्यांनी शक्य तितका ज्ञानाचा खजिना मराठीत आणावा हि विनंती.


